शनिवार, 27 जून 2015

पुष्प १६ वे - पहिला दिवस

इसे प्रकाशित किया Unknown ने तारीख और समय 5:36 pm 1 टिप्पणी
ज्या दिवसाची सार्‍या सख्या आतुरतेने वाट पहात असतात, तो दिवस आज अखेर उगवला..... आज आत्मबल बॅच २०१५ चा पहिला दिवस. सगळ्या बॅचेस्‌ची तशी स्वत:ची अशी अनोखी ओळख असते. ह्या वेळेच्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ही बॅच फक्त गृहिणींकरिता आहे.

गृहिणी म्हणण्यापेक्षा होम-मेकर म्हटलेलं नंदाईला जास्त आवडतं. ह्या होममेकर्स ज्या खर्‍या अर्थाने घरातले आधारस्तंभ असतात, त्यांना ह्या वेळेस नंदाईने मोलाची संधी दिली आहे. आज पुन्हा एकदा नंदाई निघाली आहे, एक नवीन प्रवासाला.... सार्‍या होममेकर्स चं रुपांतर एका सुंदर हंसात करण्यासाठी, प्रत्येक स्त्रीला तिची ओळख नव्याने करुन देण्यासाठी.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥