गुरुवार, 25 सितंबर 2014

नंदाईचा परिचय

इसे प्रकाशित किया Unknown ने तारीख और समय 3:00 am कोई टिप्पणी नही


गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. सौ. नंदा आत्मबल विकास स्त्रियांसाठी त्यांचा आत्मविश्वास व आंतरिक शक्ती वाढवणारा उपक्रम यशस्वीरित्या संचलित करत आहेत. त्यांनी मुंबई विद्‌यापिठामधून बायोकेमिस्ट्रीमध्ये पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून आयुर्वेद व निसर्गोपचार (नॅचरोपथी) ह्या विषयांवरही त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी ब्रेल भाषेमध्येसुद्धा प्राविण्य मिळवले असून स्वत: ३ वर्षे ब्रेल भाषा शिकवली आहे.

त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घेतले जाणारे हे आत्मबल वर्ग स्त्रियांची आंतरिक शक्ती व आत्मविश्वास ह्यांचा विकास घडवून ह्या दोन्ही गुणांना दृढ करतात व त्यायोगे स्त्रियांना धीट, स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनण्यास मदत करून त्यांना स्वत:चीच नवी ओळख करून देतात.

इंग्रजी अजिबात येत नसणाऱ्या, अगदी गंधज्ञान नसलेल्या स्त्रियांना दैनंदिन व्यवहाराला व्यवस्थित पुरे पडावे इतके इंग्रजी डॉ. सौ. नंदा अनिरुद्ध जोशी स्वत: शिकवतात. ह्यातून ह्या स्त्रियांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळतो व ह्यामधील काही स्त्रिया तर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकसमुहासमोर इंग्रजी नाटिकादेखिल सादर करतात.

आजच्या जगात इंग्रजी हा केवळ शिकण्याचा विषय राहिला नसून ही आता सर्वसामान्यांची एकमेकांत संवाद करण्याची भाषा झाली आहे. तेव्हा इंग्रजीचे जुजबी ज्ञान तर सर्वांनाच आवश्यक ठरते. परंतु एका बाजुला प्रवाही इंग्रजी बोलता न येण्यामुळे उत्पन्न होणारा न्यूनगंड व दुसऱ्या बाजुला शब्दकोषात कठिण शब्दांचे अर्थ शोधण्याचे कंटाळवाणे काम ह्यासारख्या अनेक गोष्टीच आवश्यकता असतानाही इंग्रजीत संवाद साधण्यापासून व असलेल्या ज्ञानाचे वर्धन करण्यापासून दूर ठेवतात.

आत्मबल वर्गांच्या संचलनाच्या अनेक वर्षांच्या अनुभवातूनच ह्या सर्व अडथळ्यांवर मात करणारी एक अतिशय सुंदर संकल्पना डॉ. सौ. नंदा अनिरुद्ध जोशी ह्यांना सुचली व अथक परिश्रमा अंती त्यांनी ह्या संकल्पनेला पुस्तकरूपात साकार केले आहे.

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें