गुरुवार, 25 सितंबर 2014

आत्मबल एक प्रवास...

इसे प्रकाशित किया Unknown ने तारीख और समय 2:30 am कोई टिप्पणी नही
॥ हरि  ॐ॥

आत्मबल - एक प्रवास..................


माझ्यासाठी ‘आत्मबल’ म्हणजे......
‘एका तळ्यात होती, बदके पिल्ले सुरेख
होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक’

चे रुपांतरण.......
‘एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले,
पाण्यात पाहताना, तो राजहंस एक’


    माझ्या प्रेमळ नंदाईने ‘आत्मबल’ ला प्रवेश दिला मात्र! आणि नकारात्मकतेच्या दलदलीत अडकून घेतलेल्या पिल्लाला हात देऊन सकारात्मक ‘पल्लवीवीरा’ म्हणून घडवले. मला आता पूर्वीची मी आठवले की वाटते - खरचं, ती मीच होते का? न्यूनगंड, दु:ख, अहंकाराने भरलेली! आईने तिच्या आत्मबलाच्या वर्गामधून मला यातून पूर्ण रिकामे केले - मोकळे केले. आणि भरून टाकले तिच्या खळखळत्या ओसांडून वाहणार्‍या प्रेमाने, तिच्या भरभरून टाकणार्‍या वात्सल्याने..................

    हल्ली आपण जाहिरातींमध्ये ‘आधी’ आणि ‘नंतर’ असे फोटो पाहतो असे फोटो पाहतो ना! अगदी तसेच माझे जरी साधे ‘आत्मबल’ होण्या अगोदरचे आणि नंतरचे फोटो पाहिले ना तरी लक्षात येते औदासिन्याने ग्रासलेल्या पिल्लाला निखळ कसे बनवले आहे नंदाईने!

    आईने आत्मबल वर्ग संपताना सांगितले होते, “बाळानों, तुमच्या जीवनात हा प्रवास कधीच संपू देऊ नका. हा प्रवासच तुम्हाला सुखी करेल!”

    अंबज्ञ आई, मला या प्रवासात सामील करून घेतल्याबद्दल!!!
-पल्लवीवीरा तायशेटे
मालाड(पाश्चिम) 
[आत्मबल १९९९]
॥ हरि ॐ॥

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें